हा महाराष्ट्र आहे, ना तुटेगा, ना बटेगा, ना कटेगा; संजय राऊत यांनी ठणकावले

हा महाराष्ट्र आहे, ना तुटेगा, ना बटेगा, ना कटेगा; संजय राऊत यांनी ठणकावले

महाविकास आघाडीत सर्व उत्तम सुरू आहे. आम्ही 90-90-90 जागा जाहीर केल्या आहेत. आमच्यात उत्तम समन्वय आहे, कोणीही चिंता करू नये, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत चांगलाच टोला लगावला. महाविकास आघाडी 175 जागा जिंकत 26 नोव्हेंबरला सरकार स्थापन करणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात भाजपचे कटेगा, बटेगा, तुटेगा राजकारण चालणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणाकावले

भाजप हा संस्कारहीन पक्ष आहे. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. अनेक विकृत लोकं त्या पक्षात भरलेले आहेत. घरंदाज महिलांबाबत, राजकारणातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत, अपशब्द वापरत त्यातूण तणाव निर्माण करण्याचा नवा धंदा भाजपने सुरू केला आहे. त्यातून त्यांना द्वेष पसरवायचा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

योगी आदित्यनाथ यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. ते त्यांच्या राज्यात भाजपला वाचवू शकले नाहीत. ते महाराष्ट्रात येऊन काय करणार आहेत. बटेंगे, कटेंगे अशी भडकाऊ भाषणे ते दतील. मात्र, हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात कटेंगे, बटेंगे राजकारण चालणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले. सगळ्यांचा साथ मिळवत सब का विकास हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे. जनतेला आता सर्व समजले आहे, त्यामुळे महाराष्ट्र अब नही तुटेगा और नाही बटेगा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;