लाडक्या बहिणींच्या मतासाठी दादागिरी
लाडक्या बहिणींच्या मतासाठी अजित पवारांची दादागिरी सुरू झाली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली विधानसभा निवडणुकीत आपल्या पारडय़ात मत पाडून घेण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना ‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांना सोबत न्या, असा अजब फतवाच अजित पवार गटाकडून काढण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरताना ‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांना सोबत न्या. त्यांना गुलाबी साडी परिधान करण्यास सांगा, असे पत्रकच काढण्यात आले आहे.
रमेश आडसकरांनी फुंकली तुतारी
माजलगाव मतदारसंघात अजित पवार गटाकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर भाजप नेते रमेश आडसकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत महायुतीच्या विरोधात तुतारी फुंकली आहे. रमेश आडसकर हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. 2019च्या निवडणुकीत भाजपकडून विधानसभा लढविणाऱ्या आडसकर यांचा अल्पमतांनी पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी ठेवलेला संपर्क यामुळे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासाठी लढाई कठीण झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List