महायुतीच्या काळात आर्थिक शोषण, 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार

महायुतीच्या काळात आर्थिक शोषण, 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार

साफसफाईच्या कामासाठी कंत्राटदार नेमण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याचे काम महायुतीच्या काळात सुरू झाले आहे. याचा तीक्र निषेध करत महाराष्ट्रातील  10 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी ही माहिती दिली. गेल्या अनेक कर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. राज्यभरातील 260 नगरपरिषद, 18 महापालिका, 1525 नगरपंचायत याठिकाणी  मेहतर वाल्मीक, रुखी सुदर्शन आणि अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. तसेच वाल्मिकी समाजासाठी कोणत्याही आर्थिक महामंडळाची घोषणा सरकारने केलेली नाही. त्यामुळे या समाजात तीव्र नाराजी आहे. केंद्र आणि राज्य सरकार स्वच्छ भारत अभियान मोठा गाजावाजा करत राबवत आहे. मात्र हे अभियान यशस्वी करण्यात मोलाचा काटा असलेले सफाई कामगार हे त्याच्या मोबदल्यापासून वंचित आहेत, असे चरणसिंह टाक यांनी सांगितले.

काय आहेत मागण्या

महापालिका आणि नगरपालिकेमार्फत करण्यात येणारी स्वच्छतेची कामे कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. कंत्राटदार ही कामे वाल्मिकी समाजाच्या तसेच अनुसूचित कर्गाच्या तरुणांकडून करून घेतात. मात्र त्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत नाहीत. या कंत्राटदारांकर महायुती सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याची टीका चरणसिंह टाक यांनी केली. या सगळ्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;