MP Gang Rape: पिकनिकला आलेल्या नवविवाहितेवर सामुहीक बलात्कार, पोलिसांनी आरोपींना केली अटक

MP Gang Rape: पिकनिकला आलेल्या नवविवाहितेवर सामुहीक बलात्कार, पोलिसांनी आरोपींना केली अटक

मध्य प्रदेशात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका नवविवाहीतेला ओलीस ठेवून तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी घटनेचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करुन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रीवा जिल्ह्यातील गुढं येथील पर्यटन स्थळ असलेल्या भैरव बाबा येथे नवदाम्पत्य पिकनिकसाठी गेले होते. दरम्यान पाच अज्ञात नराधमांनी त्या दाम्पत्याला मारहाण केली आणि नवऱ्याला ओलीस ठेवण्यात आले. आरोपींनी आळीपाळीने महिलेवर सामुहीक बलात्कार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपिंनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला होता आणि व्हायरल करण्याची धमकी दिली होती. ज्याने पिडीतेने तक्रार दाखल केली होती. ही घटना सोमवारी घडली होती. मंगळवारी या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयितांना अटक केली आहे. पिडीतेने पाच आरोपी असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आणि अन्य सहभागी आरोपींचा तपास करत आहेत. पोलीस अधिक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. घटनेत सहभागी 5 आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान या घटनेत सहभागी असलेल्या संशयितांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सर्व आरोपी दारु पार्टी करताना दिसत आहेत. एका आरोपीने सांगितले की, तिथे सर्व नशा करत होते. दरम्यान ते नवदाम्पत्याला पाहून भरकटले आणि पीडितेच्या नवऱ्याला मारहाण केली त्याचे हात बांधले. सर्व आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;