अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, नातं टिकवण्यासाठी काजोलचा दोघांना मोलाचा सल्ला

अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, नातं टिकवण्यासाठी काजोलचा दोघांना मोलाचा सल्ला

Kajol on Relationship: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय 2006 मध्ये प्रदर्शिद झालेल्या ‘उमराव जान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि 2007 मध्ये लग्न केलं. अनेक वर्ष सुखी संसार केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर दोघांचे असे काही फोटो, व्हिडीओ देखील व्हायरल झाले, ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी अधिक जोर धरला. पण यावर दोघांनी देखील कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, निम्रत कौर हिच्यासोबत अभिनेत्याच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. सध्या अभिषेक आणि निम्रत यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाला देखील निम्रत जबाबदार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर देखील कोणीच अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

 

 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिनेत्रीने काजोल हिने एकदा दोघांना नातं टिकवण्यासाठी सल्ला दिला होता. काजोल हिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. 2007 मध्ये दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये काजोल हिने दोघांना मोलाचा सल्ला दिला होता.

करण जोहर याच्या शोमध्ये राणी मुखर्जी, काजोल आणि शाहरुख खान उपस्थित होते. तेव्हा रॅपिड फायर राउंडमध्ये करण याने काजोल हिला एक प्रश्न विचारला. ‘ऐश्वर्या आणि अभिषेक यांना नातं टिकवण्यासाठी कोणता सल्ला देशील?’ यावर काजोल म्हणाली, ‘दोघांनी ‘कभी अलविदा ना कहाना’ सिनेमा कधीच पाहू नये…’ असं काजोल म्हणाली होती.

‘कभी अलविदा ना कहाना’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा आणि अमिताभ बच्चन आहे. सिनेमा नात्यात फसवणूक आणि विवाहबाह्य संबंधांवर आधारलेला आहे. सिनेमा 11 ऑगस्ट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली होती.

अभिषेक – ऐश्वर्या यांनी का बाळगलंय मौन?

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या खासगी आयुष्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. पण दोघांनी देखील यावर मौन बाळगलं आहे. ‘आजू-बाजूला रंगत असलेल्या चर्चांवर मी शांत राहतो…’ असं वक्तव्य एकदा अभिषेक याने केलं होतं. सध्या सर्वत्र अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;