बॉलिवूडचा गडगंज श्रीमंत स्टार किड, 1000 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक, सलमानही त्याच्या मागे

बॉलिवूडचा गडगंज श्रीमंत स्टार किड, 1000 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक,  सलमानही त्याच्या मागे

Bollywood Richest Star Kid: आउटसायडरच्या तुलनेत आर्यन खान आणि सारा अली खान यांसारख्या स्टार किड्सना सिनेमांमध्ये करिअर करण्याची संधी सहज मिळते. त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असले तरी, त्यांना अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळते. पण झगमगत्या विश्वात असा एक स्टार आहे जो स्वतःच्या मेहनतीवर आणि कौशल्यावर स्टार झाला. एवढंच नाही तर तो आज 1000 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक देखील आहे. त्यांच्या नेटवर्थ पुढे अभिनेता सलमान खान याची नेटवर्थ देखील फिकी आहे.

सध्या ज्या स्टार किडची चर्चा रंगली आहे तो अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नाही. अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ नाही. सैफ अली खान याची लेक सारा अली खान नाही. ज्याने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आणि अभिनेता हृतिक रोशन आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

 

हृतिक रोशन याने ‘कहो ना प्यार है’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवडमध्ये 24 वर्षांत हृतिकने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. डान्स आणि अभिनयाच्या जोरावर हृतिकने स्वतःची ओळख निर्माण केली. आज हृतिक याला कोणत्या ओळखीची गरज नाही.

2013 मध्ये सुरु केली कंपनी

हृतिक रोशनने नोव्हेंबर 2013 मध्ये कपड्यांचा ब्रँड HRX लॉन्च केला. रिपोर्टनुसार, हा एक फिटनेस आणि लाइफस्टाइल ब्रँड आहे जो शूज, कपडे आणि सपोर्टिंग गॅझेट्ससह विविध उत्पादने विकतो. आजच्या दिवसांत अभिनेत्याच्या HRX कंपनीची किंमत 1000 कोटी रुपये आहे. या शर्यतीत हृतिकने अभिनेता सलमान खान याला देखील मागे टाकलं आहे.

किती आहे हृतिक रोशन याची नेटवर्थ?

मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशन याची नेटवर्थ 3100 कोटी रुपये आहे. तर सलमान खान याची नेटवर्थ 2900 कोटी रुपये आहे. अभिनेता अक्षय कुमार याची नेटवर्थ 2500 कोटी रुपये आहे. अभिनेता आमिर खान याची नेटवर्थ 1862 कोटी रुपये आहे. या यादीमध्ये हृतिक सर्वात श्रीमंत स्टार किड आहे.

अभिनेता हृतिक रोशन सर्वात श्रीमंत स्टार किड आहे. पण हृतिक सर्वात श्रीमंत अभिनेता नाही. बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर अभिनेता शाहरुख खान आहे. किंग खानची नेटवर्थ 7300 कोटी रुपये आहे. आजही किंग खानचे सिनेमे पाहण्यासाठी चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमलेली असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;