‘लग्न फार काळ टिकत नाही…’, अभिषेक – ऐश्वर्याच्या लग्नावर ‘या’ अभिनेत्रीची मोठी प्रतिक्रिया

‘लग्न फार काळ टिकत नाही…’, अभिषेक – ऐश्वर्याच्या लग्नावर ‘या’ अभिनेत्रीची मोठी प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण यावर दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना अभिनेत्याचं नाव अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत जोडलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक – निम्रत यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे निम्रत हिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, निम्रतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये निम्रत आणि अभिषेक ‘दसवी’ सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये होस्टने अभिषेक यांचं ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न केल्यामुळे अभिनंदन केलं आणि लग्नाला 15 वर्ष झाल्यामुळे दोघांचं कौतुक देखील केलं.

 

 

यावर निम्रत म्हणाली, ‘लग्न फार काळ टिकत नाही…’, अभिनेत्रीचं वक्तव्य ऐकून शोचा होस्ट आणि अभिषेक दोघे हैराण झाले. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिय देत आहे.

अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमात निम्रत हिने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं होतं. पण आता दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत असल्यामुळे चाहत्यांना देखील धक्क बसला आहे. यावर दोघांनी देखील मौन बाळगलं आहे.

अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय यांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये ऐश्वर्याने आराध्या हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

कोणत्याही कार्यक्रमात किंवा सोहळ्यात ऐश्वर्या मुलीसोबत पोहोचते. तर अभिषेक बच्चन कुटुंबासोबत असतो. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;