Maharashtra Assembly Election 2024 – लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार, बारामतीत काका-पुतण्यात होणार लढत

Maharashtra Assembly Election 2024 – लोकसभेनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार, बारामतीत काका-पुतण्यात होणार लढत

लोकसभा निवडणूकीत बारामती मतदारसंघातून नणंद विरुद्ध भावजय असा सामना पाहायला मिळाला. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यानंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील नावे जाहीर केली. या यादीनुसार बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी
इस्लामपूर- जयंत पाटील
काटोल- अनिल देशमुख
घनसावंगी- राजेश टोपे
कराड उत्तर- बाळासाहेब पाटील
कळबा मुंब्रा- जितेंद्र आव्हाड
कोरेगाव- शशिकांत शिंदे
वसमत- जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण- गुलाबराव देवकर
इंदापूर- हर्षवर्धन पाटील
राहुरी- प्राजक्त तनपुरे
शिरुर- अशोकराव पवार
शिराळा- मानसिंगराव नाईक
विक्रमगड- सुनील भुसारा
कर्जत जामखेड- रोहित पवार
अहमदपूर- विनायकराव पाटील
सिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणे
उदगीर- सुधाकर भालेराव
भोकरदन- चंद्रकांत दानवे
तुमसर- चरण वाघमारे
किनवट- प्रदीप नाईक
जिंतूर- विजय भांबळे
केज- पृथ्वीराज साठे
बेलापूर- संदीप नाईक
वडगाव शेरी- बापूसाहेब पठारे
जामनेर- दिलीप खोडपे
मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
मुर्तिजापूर- सम्राट डोंगरदिवे
तिरोडा- रविकांत बोपछे
अहेरी- भाग्यश्री अत्राम
बदनापूर- बबलू चौधरी
मुरबाड- सुभाष पवार
घाटकोपर पूर्व- राखी जाधव
आंबेगाव- देवदत्त निकम
बारामती- युगेंद्र पवार
कोपरगाव- संदीप वर्पे
शेवगाव- प्रताप ढाकणे
पारनेर- राणी लंके
आष्टी- मेहबूब शेख
करमाळा-नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे
चिपळूण- प्रशांत यादव
कागल- समरजीत घाटगे
तासगाव कवठेमहाकाळ- रोहित आर आर पाटील
हडपसर-प्रशांत जगताप

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;