Rajasthan news – सिरोही जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, गाडीतील पाच जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर

Rajasthan news – सिरोही जिल्ह्यामध्ये भीषण अपघात, गाडीतील पाच जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात पाच लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

गुजरात येथून जोधपूरकडे गाडी येत असताना टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी नाल्यात जाऊन पडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर एकाची अवस्था गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या दाहोद परिसरात राहणाऱ्या पाच लोकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये प्रताप भाई, रामूराम, उषा बेन, पुष्पा देवी आणि 11 महिन्याचे बाळ आशु यांचा समावेश आहे. याशिवाय 50 वर्षीय महिला शारदा देवी यांची अवस्था गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तहसीलदार बिश्नोई आणि डेप्युटी मुकेश चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे या भागात सहा दिवसांपूर्वी तीन मोठे अपघात झाले होते. त्यात 20 लोकांचा मृत्यू झाला आणि 51 जण गंभीर जखमी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;