मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची ‘मनमौजी’ गोष्ट; पहा दमदार ट्रेलर

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची ‘मनमौजी’ गोष्ट; पहा दमदार ट्रेलर

मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट ‘मनमौजी’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत पोस्टर आणि टीजरमध्ये दिसलेल्या फ्रेशनेसमुळे चित्रपटाविषयी आधीच असलेलं कुतुहल आता आणखी वाढलं आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला ‘मनमौजी’ हा चित्रपट येत्या 8 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘गुलाबजाम’, ‘लॉस्ट अँड फाऊंड’ अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी ‘मनमौजी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचं असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केलं आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिलं आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील, अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहेत तर कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिलं आहे.

पहा ट्रेलर-

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात दोन तरुणी येतात, त्यानंतर या तरुणाचं मुलींविषयीचे विचार बदलतात का? त्याचं प्रेम जडतं का? अशा आशयसूत्रावर ‘मनमौजी’ हा चित्रपट बेतला आहे. प्रेमकथेशिवाय कथेला अनेक भावनिक पदर असल्याचंही आपल्या ट्रेलरमधून पाहायला मिळतं. उत्तम कलाकार, रंजक गोष्ट, नेत्रसुखद लोकेशन्स, श्रवणीय संगीत याचा मिलाफ ‘मनमौजी’ चित्रपटातून नक्कीच अनुभवायला मिळणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;