पुण्यात कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोघे सराईत अटकेत, एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त

पुण्यात कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोघे सराईत अटकेत, एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त

कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईतासह त्याच्या साथीदाराला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, 3 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्वरील गुन्हेगार असून कुख्यात गुंड चेतन लिमन उर्फ मामा टोळीतील असल्याचे समोर आले आहे.

सुरज महेंद्र नांगरे (21) साहील मनिष सोनवणे (22, रा. दोघे. किरकटवाडी, हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वडगाव येथील कॅनॉल रोडजवळ ही कारवाई करण्यात आली. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरेश जायभाय, अंमलदार तानाजी सागर, दत्ता मालुसरे, धनंजय गिरिगोसवी यांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान कॅनॉल रोडजवळ दोघे संशयित थांबल्याची माहिती अंमलदार सागर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता नांगरे याच्या कंबरेला पिस्तूल आढळून आले. तर, सोनवणे याच्याकडे दोन काडतुसे मिळून आली. पथकाने दोघांना अटक करून पिस्तूल जप्त केले आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;