‘गुलीगत’ सूरज चव्हाणला मिळाली दिवाळी भेट

‘गुलीगत’ सूरज चव्हाणला मिळाली दिवाळी भेट

बिग बॉस मराठी-5 चा विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणचे नशीब पालटले आहे. शो जिंकल्यानंतर सूरजला 14.6 लाख रुपये मिळाले. सूरजला एक नवा चित्रपट मिळाला आहे. आता दिवाळीआधीच एक नवी कोरी स्कुटी मिळाली आहे. ही सूरजसाठी दिवाळी भेट ठरली आहे. सूरजने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो नव्या कोऱ्या स्कूटरसोबत दिसत आहे. सूरजची ही स्कुटर इलेक्ट्रिक स्कुटर आहे. स्कुटीवर बसून सूरज आनंदी दिसत आहे. स्कुटर दिल्याबद्दल सूरजने तुनवाल ई-मोटर्सचे आभारसुद्धा मानले आहेत. सूरजच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस मराठी शो जिंकल्यापासून झापूकझुपूक म्हणत सूरजने अनेकांना वेड लावले आहे. आपलेसे केले आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;