उमेदवार ठरवणार… पण नावे जाहीर करणार नाही! मनोज जरांगे यांचा गनिमी कावा

उमेदवार ठरवणार… पण नावे जाहीर करणार नाही! मनोज जरांगे यांचा गनिमी कावा

विधानसभा लढवू इच्छिणार्‍या मराठा उमेदवारांची गुरुवारी आंतरवालीत बैठक होणार आहे. मराठा समाजाची ताकद सिद्ध करायची असेल तर एकास एक उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यामुळे बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात येणार असले तरी गनिमी कावा म्हणून त्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. विधानसभा लढवू इच्छिणार्‍या मराठा उमेदवारांची संख्या प्रचंड मोठी आहे. परंतु राजकीय गणिते बघता एकास एक उमेदवार देणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्या होणार्‍या बैठकीत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील इच्छुकांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची नावेही निश्चित करण्यात येतील, परंतु ती जाहीर करण्यात येणार नाहीत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. विरोधकांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही आमचे पत्ते उघडणार असल्याचे ते म्हणाले. इच्छुकांनी अर्ज भरावेत. ऐनवेळी कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणाचा काढायचा हे सांगण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;