Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्याकांडात आणखी एक आरोपी अटक, मुंबई पोलिसांनी हरियाणातून आवळल्या मुसक्या

Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्याकांडात आणखी एक आरोपी अटक, मुंबई पोलिसांनी हरियाणातून आवळल्या मुसक्या

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी हरियाणातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमित हिसामसिंग कुमार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य शूटर आणि हत्येचा कट रचणारे दोन आरोपी अद्याप फरार आहे. या हत्या प्रकरणी तपास यंत्रणा सर्व अँगलने तपास करत आहे.

फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस लगातार छापेमारी करत आहेत. अद्याप सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण समोर आले नाही. व्यावसायिक वैर किंवा मुंबईतील एसआरए प्रकल्प संदर्भात वादातून हत्या झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;