‘बिग बॉस 18’मध्ये करणवीर मेहरा-अविनाश मिश्रा यांचा लिपलॉक? व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा

‘बिग बॉस 18’मध्ये करणवीर मेहरा-अविनाश मिश्रा यांचा लिपलॉक? व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा

‘बिग बॉस’चा अठरावा सिझन त्यातील स्पर्धकांच्या भांडणांमुळे तुफान चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. घरातील स्पर्धकांना नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे अविनाशचं रोज कोणा ना कोणाशी भांडण होत असतं, तर दुसरीकडे करणवीर मेहरा त्याचा मुद्दा मांडल्याशिवाय मागे हटत नाही. या दोघांमध्ये सतत वाद होत आहेत. अशातच सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दोघं चक्क एकमेकांना लिपलॉक करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

अविनाश-करण यांच्यात नेमकं काय घडलं?

एक्स (ट्विटर) अकाऊंटवर अविनाश आणि करण यांचा एकमेकांना किस करतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा चार सेकंदांचा व्हिडीओ पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. एकमेकांशी नेहमीच भांडणारे हे स्पर्धक अशा पद्धतीने लिपलॉक करताना का दिसत आहेत, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. बिग बॉसच्या प्रोमोमधील हा काही सेकंदांचा व्हिडीओ फेक असल्याचंही अनेकांनी म्हटलंय. या व्हिडीओमागचं सत्य म्हणजे एका युजरने AI च्या मदतीने हा बनावट व्हिडीओ बनवला आहे. यात अविनाश आणि करण जरी दिसत असले तरी त्यांनी बिग बॉसच्या घरात लिपलॉक केलेलं नाही.

खऱ्या व्हिडीओत नेमकं काय?

या सिझनच्या दुसऱ्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये करणवीर आणि अविनाश यांच्या भांडण होतं. अविनाश करणला सुनावतो की कधीतरी आपलं काम पूर्ण करत जा. त्यानंतर करण त्याला म्हणतो, “तू टेन्शन नको घेऊस, पप्पा आले आहेत.” यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरू होते आणि दोघं एकमेकांना सुनावू लागतात. एकमेकांशी डोळ्यांत डोळे घालून ते जोरदार भांडताना दिसतात. हा व्हिडीओ एडिट करून त्यांचा बनावट लिपलॉक दाखवण्यात आला आहे. याआधीच्या एपिसोडमध्ये करण अविनाशला सुनावतो, “तुला कोण ओळखतं?” बिग बॉसच्या घरातील काम आणि खासगी विषय यांवरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाली आहेत. ‘बिग बॉस’चा अठरावा सिझन रात्री 10 वाजता कलर्स टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. हे एपिसोड्स जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;