‘दबंग 3’ अभिनेत्रीने कुटुंबियांच्या विरोधात केली 2 लग्न, पश्चाताप व्यक्त करत म्हणाली, ‘चुकीच्या व्यक्ती…’

‘दबंग 3’ अभिनेत्रीने कुटुंबियांच्या विरोधात केली 2 लग्न, पश्चाताप व्यक्त करत म्हणाली, ‘चुकीच्या व्यक्ती…’

झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. सध्या ‘दबंग 3’ आणि ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेत्री हेमा शर्मा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. हेमा शर्मा ‘बिग बॉस 18’ च्या घरातून बाहेर पडणारी पहिली अभिनेत्री आहे. शोमधून फार लवकरच बाहेर पडल्यामुळे अभिनेत्रीने खंत व्यक्त केली. ‘बिग बॉसच्या घरातील अनुभव चांगला होता. पण शोमधून बाहेर पडल्यामुळे दुःख होत आहे. जेलमध्ये सुरवातीचे 6 दिवस कठीण होते. बाहेर आल्यानंतर दोन दिवस इतर स्पर्धकांना समजण्यासाठी गेले आणि तिसऱ्या दिवशी मी बेघर झाले…’ असं म्हणत हेमाने खंत व्यक्त केली.

नुकताच झालेल्या मुलाखतीत हेमा म्हणाली, ‘प्रत्येकाला शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. पण तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होतं. माझं खासगी आयुष्य सार्वजनिक होणं आणि जगाला माझ्याबद्दल कळणं माझ्या नशिबात होतं. मी एका सेल्फ-मेड महिला आहे. माझं कुटुंब इंडस्ट्रीतील नाही… माझा कोणा गॉडफादर नाही…’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hem Lata (@hemasharma973)

 

‘मी जिद्दी आहे, सुंदर देखील आहे. पण मी एक चांगली व्यक्ती नाही. कारण मी माझ्या मनाचं ऐकते. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण मी कधीच माघार घेतली नाही. मी एकटीने मेहनत घेतली आहे.’ असं देखील हेमा म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Hem Lata (@hemasharma973)

 

आयुष्यात झालेल्या चुकांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मी काही निर्णय घेतले आणि चुका केल्या आहेत. झालेल्या चुकांचा मी स्वीकार करते. मी दोन लग्न केली आहेत. मला दोन्ही लग्न करताना विचार करायला हवा होता. मी आयुष्यात चुकीच्या व्यक्तींची निवड केली.’
मुलांच्या भविष्याबद्दल देखील हेमाने मोठं वक्तव्य केलं. ‘शोमुळे माझ्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. मला माझं वर्तमान आणि मुलांचं भविष्य चांगलं बनवायचं आहे…’ असं देखील हेमा शर्मा म्हणाली. सध्या सर्वत्र हेमा शर्मा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;