चोरट्यांचा अजब छंद! सोने-चांदीऐवजी महिलांची अंतर्वस्त्रे करताहेत चोरी, पकडण्यासाठी लावले CCTV

चोरट्यांचा अजब छंद! सोने-चांदीऐवजी महिलांची अंतर्वस्त्रे करताहेत चोरी, पकडण्यासाठी लावले CCTV

देशभरात सण उत्सवाचे वातावरण असल्यामुळे चोरट्यांची संख्या वाढली आहे. रात्रीच काय तर दिवसाढवळ्याही सोने चांदीचा ऐवज चोरीला जात आहे. मात्र, राजस्थानमधील बेवार जिल्ह्यातून चोरीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील विजयनगरमध्ये चोरट्यांनी घरात घुसून महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी केली आहे. अशा प्रकारच्या चोरीच्या घटना गेल्या 3 महिन्यांपासून सातत्याने सुरू आहेत. यामुळे महिला अस्वस्थ झाल्या आहेत. याशिवाय चोराला पकडण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घराच्या छतावर सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत.

गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या चोरीबाबात सुरुवातीला कोणीही गाजावाजा केला नाही. महिलाही याबाबत गप्प होत्या. मात्र दिवसेंदिवस चोऱ्या वाढल्यामुळे सर्वांनी मिळून विजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विजयनगरमधील टाकी गलीतील लोकांच्या घरातून गेल्या तीन महिन्यांपासून महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी होत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. या चोरांना पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीही तपासण्यात आले आहेत. यात दिसणाऱ्या चोरांचा शोध पोलीस घेत आहे. तपासादरम्यान हे चोर त्याच परिसरातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या चोरांच्या टोळीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;