Chandrapur crime news – वाघ नखांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Chandrapur crime news – वाघ नखांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

चंद्रपूरमध्ये वाघनखांची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. नंदकिशोर साहेबराव पिंगळे (वय – 59, रा. सिव्हिल लाइन, रामनगर ) आणि रवींद्र शिवचंद्र बोरकर (वय – 65) अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून दोन वाघनखं जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी वाघनखांसह या दोघांनाही वन विभागाच्या सहायक वनसंरक्षकांच्या स्वाधीन केले आहे.

जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात विशेष मोहीम राबवली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन व्यक्ती वाघनखांची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;