शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे रीघ, नवी मुंबईत भाजपात बंड; संदीप नाईकांनी फुंकली तुतारी…

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे रीघ, नवी मुंबईत भाजपात बंड; संदीप नाईकांनी फुंकली तुतारी…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिंधे, भाजप आणि अजित पवार गटातून रिघ लागली आहे. नवी मुंबईतील भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे पुत्र, माजी आमदार संदीप नाईक यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून तुतारी फुंकली. नाईक यांनी भाजपचे 28 नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सोमवारी मिंधे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आज दुसऱयाच दिवशी माजी आमदार संदीप नाईक यांनी तुतारी फुंकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सलग दुसऱया दिवशी महायुतीला ठाणे जिह्यातून मोठा धक्का बसला आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाईक यांचे स्वागत केले.

भाजपने फसवले

2019मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही, 2024मध्येही फसवणूक केली. त्यानंतर वारंवार कोंडी करण्याचा प्रयत्न केला, असा संताप संदीप नाईक यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;