सलमान खानने बिश्नोई टोळीच्या धमकीला जुमानले नाही, ‘सिंघम अगेन’मध्ये करणार कॅमियो

सलमान खानने बिश्नोई टोळीच्या धमकीला जुमानले नाही, ‘सिंघम अगेन’मध्ये करणार कॅमियो

बॉलीवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या ‘सिंघम अगेन’च्या कॅमियोबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्रा आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. आता सलमान हा सिनेमा करत असल्याच्या बातमीची पुष्टी मिळाली आहे. सलमान खान अजय देवगणच्या सिनेमात चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे.

चुलबुल पांडेच्या रुपात सलमान खान या सिनेमात दिसणार असून सिनेमात अनोखा ट्विस्ट असणार आहे.या सिनेमात चुलबुल पांडेची भूमिका सलमान खानच करत नाही, तर अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेत परतत आहे. सलमान खान पुन्हा एकदा ‘सिंघम अगेन’ कॅमियोत शुटींगसाठी मित्र रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्याशी केलेली कमिटमेण्टवर खरा उतरला आहे. सलमान त्याच्या शो मस्ट गॉनवर कायम आहे. आधी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खानचा कॅमियो रद्द झाल्याची बातमी आली होती. मात्र आता सलमान खान या सिनेमात कॅमियो करणार असल्याची पुष्टी मिळाली आहे.

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे मित्र बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असून, त्यानंतर सलमान खानची सुरक्षेत वाढ करण्यात आली. मात्र, या सगळ्यात सलमान खानने आपले काम सोडलेले नाही. सध्या तो ‘बिग बॉस 18’ चेही शूटिंग करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;