मुसळधार पावसामुळे बंगळुरूत निर्माणाधीन इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे बंगळुरूत निर्माणाधीन इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे बंगळुरूत निर्माणाधीन इमारत कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अन्य 17 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अन्य काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते.

तिघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.

बंगळुरूत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. बऱ्याच ठिकाणी वीज खंडीत झाली आहे. शहरात सर्वत्र ट्रॅफिक जॅम झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. याशिवाय पावसामुळे अनेक दुर्घटनाही घडत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;