खान कुटुंबातील सुना आणि घटस्फोट, ‘खान नावाचा वापर केला आणि…’

खान कुटुंबातील सुना आणि घटस्फोट, ‘खान नावाचा वापर केला आणि…’

Khan Family: अभिनेता सोहैल खान याची पहिली पत्नी सीमा सजदेह गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोहैल याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सीमा सजदेह हिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. सीमा आता विक्रम आहुजा याला डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय सीमा आणि विक्रम लिव्ह इनमध्ये असल्याची माहिती देखील समोर येत आहे. एका शोमध्ये सीमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला.

सीमा सजदेह आणि सोहैल खान

सीमा आणि सोहैल यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर सर्वांना धक्का बसला. पण घटस्फोट होण्याआधीच दोघे विभक्त झाले होते. फक्त दोघांच्या घटस्पोटाला कायदेशीर कागदपत्रांची गरज होती. आम्ही एकमेकांसोबत एका घरात राहणं देखील बंद केलं होतं.

 

 

घटस्फोटानंतर सीमा हिच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. ज्यावर तिने स्पष्ट भूमिका मांडली होती. ‘सीमाने फक्त खान नावाचा वापर करण्यासाठी सोहैलसोबत लग्न केलं… असं देखील अनेक जण मला म्हणाले. नावाची गरज संपली आणि कुटुंबाला सोडलं… अशा चर्चा माझ्याबद्दल रंगू लागल्या होत्या.’

 

 

‘आपण अशा समाजात राहतो, जेथे घटस्फोट कलंक मानला जातो. मी कायम वाईट कमेंट वाचल्या ऐकल्या आहेत. मी आणि सोहैल फार पूर्वी विभक्त झालो होतो. पण लोकांना वाटायचं आम्ही एकत्र आहोत. माझा मुलगा निर्वाण अशा वयात होता, जेव्हा त्याला आई – वडील दोघांची गरज होती.’

‘माझं वैवाहिक आयुष्य आणि माझा मुलगा… दोघांमध्ये मला एकाची निवड करायची होती. आमची कायम भांडणं व्हायची आणि त्याचा वाईट परिणाम मुलांवर होताना मला दिसत होतं. त्यामुळे घटस्फोट गरजेचा होता.’ असं देखील सीमा एका मुलाखतीत म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;