शिवसेनेत इनकमिंग सुरुच; कोकणात अजित पवार गटाला धक्का, अजित यशवंतराव शिवबंधनात

शिवसेनेत इनकमिंग सुरुच; कोकणात अजित पवार गटाला धक्का, अजित यशवंतराव शिवबंधनात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला एकापाठोपाठ एक धक्के बसत असून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी पक्षप्रवेश केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी तसेच पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

उद्धव ठाकरे यांनी अजित यशवंतराव यांचे पक्षामध्ये स्वागत केले. तरुण, उमदा, सुशिक्षित आणि मनापासून काम करणारा तरुण शिवसेनेत आला, तेही कोणतीही राजकीय अपेक्षा ठेऊन नाही. अनेक जण येऊ इच्छितात पण तिकीट पाहिजे. तुम्ही विदाऊट तिकीट आलेला आहात. टीसी मीच असून माझी जबाबदारी आहे की तुमचा पुढचा प्रवास सुखकर झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी मातोश्रीवर उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवसेना झिंदाबाद… उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;