विनयभंग करणारा अटकेत 

विनयभंग करणारा अटकेत 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. त्याला पोक्सो न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार या अंधेरी परिसरात राहतात. तर अटक आरोपीदेखील अंधेरी परिसरात राहतो. ते दोघे एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी ती मुलगी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेली होती. तेव्हा अटक आरोपी तेथे आला. त्याने मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून घरी नेले. तसेच तिच्यासोबत नकोसे कृत्य केले. त्या घटनेने मुलगी घाबरली. तिने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीच्या आईने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच एकाला पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून विशेष पोक्सो न्यायालयात हजर केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;