Thane Hit & Run : भरधाव मर्सिडीजची दुचाकीला धडक, अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Thane Hit & Run : भरधाव मर्सिडीजची दुचाकीला धडक, अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

श्रीवर्धन येथील तरुणीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात सोमवारी भरधाव मर्सिडीजने दुचाकीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. अपघातात दुचाकीवरील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दर्शन हेगडे असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील नीतिन कंपनी जंक्शनजवळ ही घटना घडली. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत.

दर्शन रविवारी मध्यरात्रीच्या 1.50 वाजण्याच्या सुमारास खाद्यपदार्थ आणण्यासाठी दुचाकीने चालला होता. यादरम्यान नीतिन कंपनीजवळ मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मर्सिडीजने दर्शनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात दर्शन गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा दर्शनच्या कुटुबीयांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी सायंकाळी दर्शनचा मृतदेह ताब्यात घेत कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;