कोल्डप्लेच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत फेरफार; हायकोर्टात जनहित याचिका

कोल्डप्लेच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत फेरफार; हायकोर्टात जनहित याचिका

जानेवारी 2025 मध्ये नवी मुंबईत ब्रिटीश बँड कोल्डप्लेच्या बहुप्रतीक्षित कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लाईव्ह शो, कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत होणाऱ्या काळाबाजाराकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांची गंभीर दखल घेतली आणि दिवाळी सुट्टीनंतर सुनावणी निश्चित केली. मोठ्या कार्यक्रमांच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्याची मागणी याचिकेतून केली आहे. याचिकेवर न्यायालय काय निर्देश देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत अनियमितता झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. त्यावरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. अमित व्यास यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे जनहित याचिका सादर केली.

लाईव्ह शो, कॉन्सर्टसारख्या मोठ्या इव्हेंटच्या ऑनलाईन तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. त्यांच्या विनंतीची गंभीर दखल घेत खंडपीठाने दिवाळी सुट्टीनंतर याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली.

कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकिटे ‘बुक माय शो’ या ऑनलाइन बुकिंग वेबसाइटवर उपलब्ध होती. ‘बुक माय शो’ने कॉन्सर्टच्या ऑनलाइन तिकीट विक्रीत फेरफार केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;