1 ते 19 नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या विमानांमध्ये धमाका करणार, खलिस्तानी दहशतवादी पन्नू याची धमकी

1 ते 19 नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या विमानांमध्ये धमाका करणार, खलिस्तानी दहशतवादी पन्नू याची धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने धमकी दिली आहे. 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियाच्या  विमानांमध्ये हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या दरम्यान एअर इंडियाच्या विमानात प्रवास न करण्याबाबत इशारा दिला आहे.

शिखांविरोधी दंगलीला 40 वर्ष पूर्ण झाल्याचा हवाला देत सोमवारी ही धमकी देण्यात आली आहे. त्याने मागच्या वर्षीही याच दरम्यान धमकी दिली होती. पन्नू सिख फॉर जस्टीस नावाच्या संघटनेचा संस्थापक आहे. तो कॅनडा आणि अमेरिकेत लपलेला आहे. त्याच्याकडे दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. त्याने दावा केला आहे की, “शीख हत्याकांडाला 40 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानावर हल्ला होऊ शकतो.”

पन्नूने ही धमकी अशावेळी दिली ज्यावेळी हिंदुस्थानला एकावेळी अनेक विमानांना बॉम्बने उडविण्याच्या खोट्या धमक्या मिळाल्या आहेत. हिंदुस्थान आणि कॅनडामध्ये वाद सुरु आहे. हिंदस्थानचा आरोप आहे की, कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. तर हिंदुस्थान देशातील खलिस्तानी घटकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. दहशतवाद्यांनी हरदीप सिंह निज्जर हत्येनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये, पन्नूने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात येणार असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ जारी केला होता. 19 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. या दिवशी एअर इंडियाने उड्डाण करू नका. एनआयएने त्याच्यावर गुन्हेगारी कट रचणे, धर्माच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) विविध गुन्ह्यांचा आरोप केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;