‘या’ अभिनेत्रीला अभिषेक बच्चन करतोय डेट, ऐश्वर्याला देणार घटस्फोट? चाहत्यांकडून संताप व्यक्त

‘या’ अभिनेत्रीला अभिषेक बच्चन करतोय डेट, ऐश्वर्याला देणार घटस्फोट? चाहत्यांकडून संताप व्यक्त

Abhishek Bachchan Love Life: गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. पण घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या – अभिषेक आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. एवढंच नाहीतर, अनेक कार्यक्रमांमध्ये देखील ऐश्वर्या लेक आराध्या सोबत पोहोचते. तर अभिषेक सोबत पूर्ण बच्चन कुटुंब असतं. एकीकडे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अभिषेक बच्चन याच्या नावाची चर्चा सहअभिनेत्रीसोबत रंगत आहेत. अभिनेत्री आणि अभिषेक यांनी ‘दसवी’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. एवढंच नाही तर, चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘लंचबॉक्स’ सारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री निम्रत कौर आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

निम्रत कौर हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये निम्रत कौर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पापाराझी विरल भयानीने इन्स्टाग्रामवर निम्रत कौरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान, अभिषेक सोबत अफेअरची चर्चा रंगल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी अभिनेत्रीवर संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने विचारलं, ‘निम्रत खरंच अभिषेकला डेट करत आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘निम्रत बच्चन होण्याचा स्वप्न पाहात आहे?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ऐश्वर्याचा संसार मोडला…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेकच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
अभिषेक बच्चन – निम्रत कौर यांच्या ‘दसवी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेत्रीने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. काही रिपोर्ट्समध्ये, सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांच्या नात्याला सुरुवात झाली… असा देखील दावा केला जात आहे. पण यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;