जमीन खरेदीतून महिलेची 26 लाखांची फसवणूक, 14 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जमीन खरेदीतून महिलेची 26 लाखांची फसवणूक, 14 जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मिळकतीचे खरेदीखत करून घेत खरेदीखतामध्ये दाखविण्यात आलेली 25 लाख 87 हजारांची रक्कम न देता महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदुबाई गोविंद बेरड (रा. भिस्तबाग चौक, सावेडी) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून, त्या 3 फेब्रुवारी 2023 रोजी मयत झाल्या आहेत.

या प्रकरणी बहिरू सूर्यकांत ऊर्फ कांता मगर (वय 35, मूळ रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर. सध्या रा. सेक्टर नंबर 38, खारघर, नवी मुंबई) यांनी बुधवारी (दि. 16) दिलेल्या फिर्यादीवरून 14 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 7 ऑक्टोबर 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 दरम्यान घडली आहे.

इंदुबाई बेरड यांच्या गाळ्यात भाडोत्री दुकान असलेला जिशान रशीद सय्यद (रा. गजराजनगर, छत्रपती संभाजीनगर रस्ता, अहिल्यानगर), खरेदीदार मीना नंदू बारस्कर, अमोल नंदू बारस्कर, संकेत नंदू बारस्कर (तिघे रा. सिमला कॉलनी, पंचवटीनगर, सावेडी), ध्येय मल्टीस्टेटचा संचालक राहुल कराळे, मॅनेजर भूषण सुदाम शिंदे (दोघे रा. पोलीस मुख्यालयाजवळ, बालिकाश्रम रस्ता), कॅशिअर भारती राजू घाडगे, क्लार्क सागर पाडळे (पत्ता नाही), छत्रपती मल्टिस्टेट अहिल्यानगरचा मॅनेजर रंगनाथ आडसरे (रा. शिवतेज चौक, यशोदानगर, सावेडी), कॅशिअर गायत्री भागवत, ध्येय मल्टिस्टेटचा चेअरमन विशाल भागानगरे, ताबेदार प्रकाश एन. सावंत, अजय डी. गर्जे व निखिल सी. शेकडे (पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी कांता मगर यांची आत्या इंदुबाई बेरड यांच्या नावे भिस्तबाग चौक सावेडी येथे प्लॉट व निंबोडी (ता. नगर) येथे शेतजमीन अशी स्थावर मिळकत होती. त्यांच्या वयोवृद्ध व अशिक्षितपणाचा फायदा घेत संशयित आरोपी यांनी संगनमत करून सदरच्या स्थावर मिळकतीचे खरेदीखत केले. जिशान सय्यद याच्या मदतीने मीना बारस्कर, अमोल बारस्कर, संकेत बारस्कर यांनी सदरची मिळकत खरेदी केली. तसेच खरेदी खतामध्ये दाखविलेली रक्कम 25 लाख 87 हजार रुपये त्यांनी इंदुबाई यांना न देता फसवणूक केली. दरम्यान, इंदुबाई यांचा 3 फेब्रुवारी 2023 रोजी मृत्यू झाला. इंदुबाई यांच्या मृत्यूनंतर संशयित आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून मिळकतीचा बेकायदेशीर ताबा घेतला. खरेदीखतात इंदुबाई यांना दिलेले चेक परस्पर ध्येय मल्टिस्टेटचे संचालक व कर्मचाऱयांच्या मदतीने संगनमत करून रोख स्वरूपात काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;