Maharashtra election 2024 – व्हेज थाळी 180, नॉनव्हेज 240, चहा 10 रुपये; निवडणूक आयोगाने दर केले निश्चित

Maharashtra election 2024 – व्हेज थाळी 180, नॉनव्हेज 240, चहा 10 रुपये; निवडणूक आयोगाने दर केले निश्चित

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, निवडणूक आयोगाने जेवणाची थाळी, चहा, पाणी यांचे दर निश्चित केले आहे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाई होणार आहे. व्हेज थाळी 180, नॉनव्हेज थाळी 240 रुपये, पोहे 20, चहा 10, तर पाणी बाटलीचा दर 17 रुपये ठेवण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. येत्या मंगळवारपासून (दि. 22) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदान होईपर्यंतचा खर्च उमेदवाराला निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. उमेदवाराने केलेला खर्च आणि सादर केलेल्या खर्चाची निवडणूक शाखेकडून पडताळणी केली जाते. यंदा निवडणूक आयोगाने वाढती महागाई लक्षात घेऊन उमेदवाराला 40 लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 28 लाखांची होती. यंदा यामध्ये 12 लाखांची वाढ करण्यात आली आहे. बैठका, रॅली, सभा आणि जाहिराती, पोस्टर्स, वाहनांचा खर्च आदींचा यामध्ये समावेश आहे.

उमेदवाराला प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी चहापान, जेवण, सभा, प्रचारासाठी वाहन, रॅली, जाहिरात आदी बाबींवर खर्च करावा लागतो. हा खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागतो. यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने खर्चाचे दर निश्चित केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून हा खर्च ग्राह्य धरला जातो. यासाठी उमेदवाराला राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत खाते उघडू शकतो. उमेदवारी अर्ज भरताना खर्चाच्या नोंदीसाठी रजिस्टर दिले जाते. त्या रजिस्टरमध्ये उमेदवारास निवडणूक काळातील खर्च, दैनंदिन खर्च नोंद करणे अनिवार्य असते.

n खर्चांचा प्रकार व दर ः व्हेज थाळी स्पेशल 180, नॉनव्हेज थाळी 240, बिर्याणी 150, पोहे 20, चहा 10, कॉफी 15, वडापाव 15, भजे प्लेट 20, पाणी बाटली 17, मिसळपाव 60, पाव भाजी 60, फुलांचा हार 80, गांधी टोपी 10, फेटा 190, ढोल-ताशा (प्रतिव्यक्ती) 500 रुपये.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;