अजब प्रेम की गजब कहानी , भाजप नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाईन निकाह

अजब प्रेम की गजब कहानी , भाजप नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाईन निकाह

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिह्यातील एका भाजप नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाईन निकाह केला आहे. मोबाईलवर ऑनलाईन निकाल लावल्यानंतर याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. जौनपूरमधील भाजपचे नगरसेवक तहसीन शाहीद यांनी त्यांचा मोठा मुलगा मोहम्मद अब्बास हैदर याचा निकाह लाहोरमधील पाकिस्तानी मुलगी अंदलीप जहरा हिच्यासोबत करण्याचे ठरवले होते. हा निकाह पाकिस्तानात होणार होता. त्यांनी व्हिसा मिळावा यासाठी रीतसर अर्जसुद्धा केला होता, परंतु दोन्ही देशांमध्ये असलेल्या राजकीय तणावामुळे लग्नासाठी ऐनवेळी व्हिसा मिळू शकला नाही. तसेच वधूची आई राणा यास्मिन झैदी या आजारी पडल्या. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ही गंभीर परिस्थिती पाहून दोन्हींकडच्या मंडळींनी वधू आणि वर यांचा ऑनलाईन निकाह लावून देण्याचे ठरवले. शुक्रवारी रात्री हैदर यांच्यासह वर पक्षाकडील मंडळी एका ठिकाणी एकत्रित येत ऑनलाईन निकाहमध्ये सहभागी झाली, तर वधूकडील मंडळी लाहोरमधून सहभागी झाली.

अन् निकाह पार पडला.

दोन्ही पक्षांकडील मंडळीच्या उपस्थितीत ऑनलाईन निकाहानंतर माझ्या पत्नीला आता हिंदुस्थान सरकार व्हिसा देईल अशी अपेक्षा आहे, असे नवरदेव हैदर याने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;