साडी नेसून, लिपस्टिक लावून 22 वर्षीय तरुणाने जीवन संपवले; उत्तराखंडमधली धक्कादायक घटना
उत्तराखंडमधील मसूरीमध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने साडी नेसली होती आणि लिपस्टिक लावली होती.
तरुणाचे नाव अनुकाल रावत असून तो अकादमीच्या मल्टी टास्क डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय निवासस्थानात तो एकटा राहत होता. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या रूमचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी दरवाज्याची कडी तोडली आणि प्रवेश केला. तेव्हा तरुणाचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे तरुणाने एखाद्या महिलेप्रमाणे साडी नेसली होती, बांगड्या घातल्या होता, टिकली लावली होती आणि लिपस्टिकसुद्धा लावली होती. एखाद्या महिलेप्रमाणे साजश्रृंगार करून या तरुणाने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List