‘चिकनी चमेली’वर जिनिलीया-रितेशचा जबरदस्त डान्स; चाहत्यांनी कौतुक करत म्हटलं, ‘वहिनी लय भारी’…
जिनिलीया आणि रितेश देशमुखची जोडी ही बॉलीवूडमध्ये तसेच सोशल मीडियावर सर्वांना आवडणारी जोडी आहे. हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.ते एकमेकांसोबतचे फोटो आणि रील्स,व्हिडीओ सतत सोशल मीडियावर आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात. चाहत्यांना सुद्धा त्यांचे व्हिडीओ पाहायला आवडतात. महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीच्या एका व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकताच या दोघांनी आपल्या मित्रमंडळींसह एका गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
‘चिकनी चमेली’वर रितेश-जिनिलीया भन्नाट डान्स
रितेश-जिनिलीया त्यांचे डान्सचे व्हिडीओ नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त रितेश परदेशात होता. कतरिना कैफचं ‘चिकनी चमेली’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे, आजही हे गाणं लागलं पाय आपोआप थिरकायला लागतात. रितेश-जिनिलीयाने आपल्या मित्रमंडळींसोबतच याच ‘चिकनी चमेली’ गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
गाण्याच्या व्हिडीओमध्ये रितेश-जिनिलीयासोबत जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बांगर्गी हे सगळे कलाकार जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला जिनिलीयाने ” यु अँड अस फॉरेव्हर”, “फनटाईम” असे कॅप्शन दिले आहेत.
रितेश-जिनिलीयाच्या डान्सच्या व्हिडीओवर तासाभरातच लाखों व्ह्यूज
रितेश-जिनिलीयाच्या व्हिडीओचं चाहत्यांनी फार कौतुक केलं आहे. व्हिडीओला अवघ्या तासाभरात लाखो व्ह्यूज मिळाले आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्स केले आहेत. “वहिनी लय भारी”, “याला म्हणतात खरा वेडेपणा…तुम्ही मस्त एंजॉय करता”, “मराठी परिवारात आलं की असंच होतं” “आम्हाला असे मित्र का नाहीत?”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत. मुळात म्हणजे या व्हिडीओमध्ये सर्वांनी ट्रेडिशनल पोषाख घातलेला पाहायला मिळतोय. रितेश-जिनिलीयाचे बरेचसे फनी डान्स व्हिडीओ, किंवा रिल्स हे याच मित्रमंडळींसोबत पाहायला मिळतात.

रितेश आणि जिनिलीयाचे नवीन चित्रपट लवकरच
रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं तर या दोघांचेही आता नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रितेशचा ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपट येणार आहे. तर, जिनिलीया देशमुख लवकरच आमिर खानबरोबर ‘सितारे जमीन पर’ या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. बऱ्याच काळानंतर जिनिलीया हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय असं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीच्या या आगामी चित्रपटांची आता चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List