जास्तित जास्त मुले जन्माला घाला, चंद्राबाबू नायडू यांचे जनतेला आवाहन

जास्तित जास्त मुले जन्माला घाला, चंद्राबाबू नायडू यांचे जनतेला आवाहन

वृद्धांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जोडप्यांनी जास्तित जास्त मुले जन्माला घाला असा अजब सल्ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. यावेळी चंद्राबाबू यांनी वृद्धांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे.

”लोकसंख्या घटणे आणि तरुणांचे स्थलांतर ही बाब राज्यासाठी धोकादायक आहे. दोनापेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्यासाठी आम्ही जोडप्यांना प्रोत्साहन देणार आहोत. दोन पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या जोडप्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रतिबंध करणारा पूर्वीचा कायदा आम्ही रद्द केला आहे. दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता याव्यात, यासाठी सरकार कायदा आणण्याचा विचार करत आहे, असे चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे.

देशात प्रजनन दर हा सरासरी 2.1 आहे तर आपल्या राज्यात हा दर 1.6 वर आला आहे. राज्यात वृद्धांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील खेडे गावांमध्ये केवळ वृद्ध लोक आहेत. कारण तरुण पिढी देशाच्या विविध भागात आणि परदेशात स्थलांतरित झाले आहेत. राज्याच्या दृष्टीने हे चांगले नाही. या दिशेने पावले न उचलल्यास आंध्र प्रदेशला जपान आणि युरोपसारख्या परिस्थितीला सामोरे जावं लागेल”, अशी चिंता चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;