नीलम कोठारीने सांगितलं पहिल्या नवऱ्याचं सत्य, ‘दारू प्यायला लावयचा आणि…’

नीलम कोठारीने सांगितलं पहिल्या नवऱ्याचं सत्य, ‘दारू प्यायला लावयचा आणि…’

‘फॅबुलस लाइव्स वर्सेज बॉलिवूड वाइव्स’ शोचा तिसरा सिझन सुरु झाला आहे. तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेता रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर सहानी, शालिनी पासी, कल्याणी साहा चावला, महीप कपूर, सीमा सजदेह, भावना पांडे आणि नीलम कोठारी देखील आहेत. नीलम हिचं पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न अभिनेता समीर सोनी याच्यासोबत केलं. अभिनेत्रीच्या पहिल्या पतीचं नाव ऋषी सेठिया असं आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने धक्कादायक अनुभव सांगितला. शिवाय मुलीबद्दल देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

नीलम कोठारी हिच्या मुलीला घटस्फोटाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं. ज्यामुळे अभिनेत्रीच्या मुलीला मोठा धक्का बसला. ‘घरी परतल्यानंतर अहाना तिच्या मैत्रिणींसोबत होती. ती कायम घरात गोंधळ घालत असते. पण तेव्हा ती शांत होती. अहाना माझ्या जवळ आली आणि तिने मला विचारलं, ‘तुझा घटस्फोट झाला आहे?’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam (@neelamkotharisoni)

 

पुढे नीलम म्हणाली, ‘अहानाला काय सांगू मला कळत नव्हतं तिला सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. मी तिला विचारलं, तुला याबद्दल कसं माहिती झालं? माझी लेक मला म्हणाली, तू सेलिब्रिटी आहेस. त्यामुळे माझ्या मित्रांनी तुझ्याबद्दल गुगलवर माहिती सर्च केली तेव्हा मला कळलं… माझ्या मुलीला घटस्फोटाबद्दल अशा प्रकारे माहिती पडावं… अशी माझी इच्छा कधीच नव्हती.’ असं अभिनेत्री म्हणाली.

लग्नानंतर परदेशात शिफ्ट झाली अभिनेत्री…

घटस्फोटावर बोलताना अभिनेत्री भावूक झाली. शिवाय तिच्या डोळ्यातून पाणी देखील आलं. ‘लग्नानंतर मी परदेशात गेली. मला भारतीय कपडे घालावे लागतील आणि मांसाहार सोडावा लागेल असं सांगण्यात आलं. पण दारु पिण्यासाठी मला सांगितलं जायचं. सर्वकाही करण्यास मला काहीही हरकत नव्हती… माझ्या मते काही तर स्वतःचं नाव देखील बदलतात. पण नाव बदलण्यावर मी सहमत नव्हती…’

‘अशा पातळीवर पोहोचली जेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला… मी असं का होऊ देत आहे? मी सुपरमार्केटमध्ये जायची किंवा हॉटेलमध्ये जायची तेव्हा मला अनेक जण विचारायचे ‘तुम्ही नीलम आहात का?’ मला नकार द्यावा लागत होता… हा अनुभव माझ्यासाठी त्रासदायक होता. ज्यामुळे घर सोडण्याचा निर्णय घेतला.’ असं म्हणत नीलम हिने खंत व्यक्त केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;