सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला लॉरेन्स बिश्नोईला काय द्यायचाय मेसेज? मोठा खुलासा

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला लॉरेन्स बिश्नोईला काय द्यायचाय मेसेज? मोठा खुलासा

Salman Khan: अभिनेता सलमान खान याला सतत धमक्या मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाईजानचे खास मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. कारण सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर सलमान खान आहे. सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगलेली असताना एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने लॉरेन्स याच्यासोबत झूम कॉलवर संवाद व्हावा अशी मागणी केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली होती. पण त्यानंतर सोमीने पोल्ट डिलिट केली.

आता सोमी अली खुलासा केला आहे की, तिला लॉरेन्ससोबत नक्की काय बोलायचं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘सलमान खान याला सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे मला चिंता वाटत आहे. त्यामुळे शांतपणे मला लॉरेन्ससोबत बोलायचं आहे. 90 च्या दशकापेक्षा आजची फिल्म इंडस्ट्री प्रचंड वेगळी आहे. पण सुरक्षा कायम चिंताचा विषय राहिला आहे.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 

‘विशेषतः महिलांसाठी सुरक्षा हा मुद्दा कायम महत्त्वाचा राहिला आहे. मला कधी समोरुन धमकी कोणी दिली नाही. पण असे अनेक प्रसंग आले ज्यामुळे मला असहज वाटू लागलं..’ असं देखील सोमी अली म्हणाली.

अशाच एका घटनेचा संदर्भ देत सोमी म्हणाली- मार्च 1993 मध्ये मी आणि श्रीदेवी मुंबईतील सीरॉक हॉटेलमध्ये थांबलो होतो. आम्ही तेथून एका आठवड्यामध्ये निघालो. काही दिवस आणि आठवडाभरानंतर हॉटेलला लक्ष्य करण्यात आले. यानंतर मी पूर्णपणे घाबरलं.

सोमी अली आणि सलमान खान

सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. सलमान खान याच्या गर्लफ्रेंड्सच्या यादीमध्ये अभिनेत्री सोमी अली हिचं देखील नाव आहे. पण सोमी – सलमान यांचं नातं फार काळ टिकलं नाही. सोमी अली हिला डेट करत असताना सलमान खान याच्या आयुष्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची एन्ट्री झाली.

रिपोर्टनुसार, सलमान – सोमी यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. ‘बुलंद’ सिनेमात दोघांनी एकत्र काम देखील केलं. 1999 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमीने भारत सोडून निघून गेली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;