सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका

सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांची आक्रमक भूमिका

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्याचा फटका महायुतीला बसला होता. तसेच विधानसभा निवडणुकीपुर्वी मराठा समजाला आरक्षण देण्याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला अनेकदा इशारा दिला होता. आता निवडणुका जाहीर झाल्याने पाडायचं की लढायचं याबाबत जरांगे भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष आहे. आता जरांगे यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, असे ठणाकावले आहे.

अनेक राजकीय तज्ञ अभ्यासक आणि वकिलांसोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी बैठक घेतली आहे. तसेच समजातील अनेकांच्या भूमिकाही ते समजून घेत आहे. त्यानंतर निवडणुकीत ते पाडापाडीची भूमिका घेतात की निवडणुकीत स्वतःचे उमेदवार उभे करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवार, राजकीय तज्ञांशी चर्चेनंतर जरांगे त्यांची भूमिका रविवारी जाहीर करणार आहेत. मराठा आरक्षणाची निवडणुकीबाबत भूमिका काय राहणार याबाबत रविवारी बैठक असून बैठकीतच निर्णय घेईन असे जरांगे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षण कसे देत नाहीत बघूच… सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही,असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

आमच्या आनंदात विष कालवण्याचं काम केलं. आमच्या लेकराच्या काळजावर यांनी आरक्षण न देऊन वार केलेत. आमच्या हातातोंडाशी आलेला घास होता. आमचा हातही छाटला आणि घासही काढून घेतला. देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकार नसताना आमच्या लेकरांच्या माना त्यांनी पिरगळल्या आहेत. जाता जाता आम्हाला खुन्नस देऊन आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. पण मराठ्यांना काही आरक्षण दिलं नाही. सरकारची वाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. सरकारने आमची घर उन्हात बांधली आहेत. त्यांना सत्तेत बसायचं आहे. त्यांना मारामाऱ्या भांडण लावायचे आहेत. योजना आणायच्या. त्यांच्या या क्रूरपणाचा शेवट मराठे करणार, असं जरांगे म्हणाले. आमची भूमिका बैठकीत ठरवू असेही ते म्हणाले. हे कसं आरक्षण देत नाही ते दाखवतोच. निर्णय बैठकीतच सांगेन असं जरांगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;