जीएसटी विभागाला 561 कोटींचा गंडा आठजणांवर गुन्हा; एकाला अटक

जीएसटी विभागाला 561 कोटींचा गंडा आठजणांवर गुन्हा; एकाला अटक

बनावट कंपनीच्या नावे कागदपत्रे तसेच बनावट जीएसटी ई-बिल टॅक्स पावत्या सादर करून तब्बल 561 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कर चुकविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जीएसटी विभागाच्या पुणे कार्यालयाने केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, यातील एकाला जीएसटीच्या पथकाने हैदराबाद येथून अटक केली आहे.

मोहम्मद रियाजउद्दीन (रा. हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, त्याचे साथीदार अब्दुल सलाम ऊर्फ सलामभाई, नैशाब मलिक नौशादभाई, सलमान मलिक, शादाबभाई, तन्वीर, ओविसिस, राजू यादव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत जीएसटी, पुणे कार्यालयातील अधिकारी रवि भूषणप्रसादसिंग कुमार (वय 34) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात एन. एल. ट्रेडर्स या खात्याची ऑनलाइन तपासणी केली. तेव्हा काही व्यवहार संशयास्पद आढळून आले. त्यानंतर जीएसटी कार्यालयातील पथकाने चौकशी सुरू केली. नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात एका भंगार साहित्य खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे चौकशी केली. त्यांच्याकडे जीएसटी करभरणा पावत्यांबाबत चौकशी करण्यात आली, तेव्हा हैदराबाद येथील एका कंपनीचे सलीम भाई यांनी पावत्या दिल्याची माहिती त्याने दिली. कर पावत्यांबाबत संशय आल्याने याबाबतची माहिती हैदराबाद जीएसटी कार्यालयाला कळविण्यात आली. हैदराबाद येथील पथकाने चौकशी केली, तेव्हा अशाप्रकारची कंपनी तेथे अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. तांत्रिक तपासणीत मोहम्मद रियाजउद्दीन याने जीएसटी करपावती तयार केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पथकाने त्याला हैदराबाद येथून अटक करून त्याच्याकडून दोन लॅपटॉप, चार मोबाइल, पेनड्राइव्ह तसेच बनावट पावत्या जप्त केल्या. त्याने 58 कंपन्यांसाठी करभरणा पावत्या तयार केल्याचे समजत असून, यात आरोपी अब्दुल सलाम ऊर्फ सलामभाई, नैशाब मलिक नौशादभाई, सलमान मलिक, शादाबभाई, तन्वीर, ओविसिस, राजू यादव यांची नावे निष्पन्न झाली. बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

साडेतीन वर्षांपासून सुरू होता प्रकार

आरोपी यादव याच्यामार्फत बनावट पावत्यांद्वारे कर भरल्याचे भासवून फसवणूक करण्याचे काम सोपविण्यात आले होते.
जानेवारी 2021 ते 8 ऑक्टोबरपर्यंत आरोपींनी बनावट करभरणा पावत्या तयार करून 561 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;