वाशिष्ठी नदी ‘गाळ’ फुल्ल; कोटय़वधींचा खर्च पाण्यात

वाशिष्ठाr नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाने कोटय़वधी रुपये खर्च केले; मात्र पावसाळ्यानंतर वाशिष्ठाr नदीचे पात्र पुन्हा गाळाने भरले आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पूरमुक्तीसाठी गाळ काढणे हा एकमेव उपाय आहे का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

नदीत अजून अनेक ठिकाणी गाळाची बेटे आहेत. ती काढण्याचे काम शिल्लक असताना या वर्षी झालेल्या पावसानंतर नदीपात्रात पुन्हा नव्याने गाळ साचला आहे. गाळ काढण्यासाठी शासनाने तीन टप्पे तयार केले आहे. त्यातील दोन टप्पे चिपळूण शहराच्या आजूबाजूचा परिसर आणि तिसरा टप्पा ग्रामीण भागाचा आहे.

गाळ काढण्याला प्राधान्य

चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी तत्कालीन सरकारने मोडक समिती तयार केली होती. या समितीने सह्याद्रीच्या खोऱयातील वृक्षतोडीवर बंदी घालावी. तसेच वाशिष्ठाr नदीवर छोटे बंधारे बांधण्यात यावेत अशी शिफारस केली होती.

नियोजन गरजेचे

चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी वाशिष्ठाr नदीमध्ये गाळ येणारच नाही, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. डोंगराळ भागात नुसत्या चरी मारून उपयोग नाही. त्यासाठी नियोजनपूर्वक काम करण्याची खरी गरज आहे. प्रत्येक भागात वेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

-शाहनवाज शाह, जलदूत चिपळूण

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;