‘ करवा चौथ’ची क्रेझ वाढली; तब्बल 22 हजार कोटींची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज

‘ करवा चौथ’ची क्रेझ वाढली; तब्बल 22 हजार कोटींची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज

सध्या देशात सण उत्सवाचे वातावरण असून रविवारी करवा चौथचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाचे देशाच्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. मुख्यत: विवाहित महिलांसाठी हा सर्वात महत्त्वाचा आणि खास सण आहे. गेल्या काही वर्षांपासून करवा चौथची क्च्यारेझ वाढत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. यंदा या निमित्ताने दिल्लीसह अनेक शहरातील बाजारपेठांमध्ये सुमारे 22 हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 15 हजार कोटींहून अधिक होता.

गेल्या दोन दिवसांपासून देशातील बाजारपेठांमध्ये करना चौथ या सणाच्या खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे. कपडे, दागिने, मेकअप-प्रोडक्ट, भेटवस्तू आणि पुजेच्या वस्तूंपासून बऱ्याच गोष्टींना बाजारात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे देशभरात सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर फक्त दिल्लीतच जवळपास 4 हजार कोटी रुपयांची विक्री होणार आहे.

करवा चौथच्या दिवशी महिला आपल्या पतीसाठी साज श्रृंगार करतात. या दिवशी मेहंदी लावणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशी मेहंदीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे करवा चौथचा हा सण उत्तम व्यवसायासाठी मोठी संधी आहे. हिंदुस्थानी परंपरेनुसार नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्नसोहळ्यांसाठी सोन्याच्या दागिन्यांचे बुकिंग करवा चौथपासून सुरू होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;