माधुरी दीक्षितला लग्नानंतर झालेला पश्चाताप, म्हणाली, ‘ते दुसऱ्याची काळजी घ्यायचे आणि मी…’

माधुरी दीक्षितला लग्नानंतर झालेला पश्चाताप, म्हणाली, ‘ते दुसऱ्याची काळजी घ्यायचे आणि मी…’

Madhuri Dixit on Marriage Life: 90 च्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. एक काळ असा होता जेव्हा माधुरी सोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते रांगेत असायते. पण बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना माधुरीने अमेरिकेत जाऊन लग्न केलं आणि तिच्या लग्नाबद्दल बॉलिवूडला कल्पना देखील नव्हती. अमेरिकेत अभिनेत्रीने डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर माधुरी अनेक वर्षी अमेरिकेत राहिली.

एकदा माधुरी दीक्षितने लग्नानंतर तिचं आयुष्य किती बदललं ते सांगितलं होतं. परिस्थिती अशी होती की माधुरी दीक्षितला तिच्या लग्नाचा पश्चाताप होऊ लागला. एका मुलाखतीत अभिनेत्रीने मनातील खंत बोलून दाखवली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Shriram Nene (@drneneofficial)

 

लग्नानंतर माधुरीने वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. ‘लग्नानंतर अनेक गोष्टी नव्या असतात आणि त्या संभाळणं कठीण जातं. मला सर्वत्र काही एकत्र सांभाळता येत नव्हतं. माझे पती तेव्हा रुग्णांची काळजी घेण्यात व्यस्त असायचे आणि मी घरी एकटी असायची…’

‘सतत व्यस्त असल्यामुळे नेने यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता. ते कायम त्याच्या कामात व्यस्त असायचे. अशात संपुर्ण घराची जबाबदारी माझ्यावर होती. मुलांना शाळेत घेऊन जा. घरची कामं… कामांचं डोंगर माझ्यावर असायचं… त्यामुळे एकवेळ अशी आली आणि मला वाटलं की लग्न का केलं. मला पश्चाताप होऊ लागला होता. ‘

मात्र, माधुरी दीक्षितला पतीचा अभिमान देखील वाटायचा. याविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, ते रुग्णांची खूप सेवा करतात. मला त्यांचा अभिमान वाटतो. दोघांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, माधुरी हिने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं.

माधुरी आणि नेने यांनी लग्नानंतर दोन मुलांचं जगात स्वागत केलं. 17 मार्च, 2003 मध्ये माधुरी हिने अरिन नेने याला जन्म दिला. त्यानंतर 8 मार्च 2005 मध्ये अभिनेत्रीने दुसरा मुलगा रयान नेने याला जन्म दिला. अभिनेत्री कायम कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;