हरिहरेश्वरमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा राडा; हॉटेल मालकाच्या बहिणीला स्कॉर्पिओखाली चिरडलं
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या हरिहरेश्वर येथे धक्कादायक घटना घडली आहे. रुमचा रेट विचारण्यावरून पर्यटक आणि हॉटेल मालकामध्ये वाद झाला. हा एवढा विकोपाला पोहोचला की मद्यधुंद पर्यटकांनी हॉटेल मालकाच्या बहिणीच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी चढवली. यात हॉटेल मालकाच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला.
ज्योती सुधाकर धामणसकर (वय – 34) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री साडे बाराच्या सुमारास घडली. यामुळे खळबळ उडाली असून सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List