जे. जे. शूटआऊट, 32 वर्षांनंतर फरार आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात

जे. जे. शूटआऊट, 32 वर्षांनंतर फरार आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात

जे. जे. शूटआऊट प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तब्बल 32 वर्षांनंतर ही कारवाई केली असून पोलिसांनी यूपीतल्या कारागृहातून त्रिभुवन सिंह ऊर्फ प्रधान उैर्फ श्रीपती श्रीकांत (62)या शूटरचा ताबा घेऊन त्याला मुंबईत आणले.

12 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. इस्पितळात रात्रीच्या वेळी दाऊदने त्याच्या शूटर्सकरवी गोळीबार घडवून आणला होता. अरुण गवळी टोळीतील शैलेश हळदणकर व बिपीन शेरे हे दोघे जे. जे. इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्यावर दाऊदने हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी शूटर्सनी या दोघांच्या संरक्षणसाठी तैनात असलेल्या दोघा पोलिसांवर एके 47 रायफलमधून गोळय़ा झाडल्या. त्यानंतर बिपीन आणि शैलेशवर गोळीबार केला होता. त्यात बिपीन वगळता दोन पोलीस आणि शैलेश जागीच मारले गेले, तर गंभीर जखमी झालेला बिपीन नंतर उपचारादरम्यान मृत पावला होता. या हल्ल्यात सहभागी असलेला त्रिभुवन सिंह हा यूपीत जाऊन लपला होता. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला पकडल्याने तो तेथील अन्य गुह्यांत कारागृहात होता. त्याचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलीस सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्रिभुवनचा ताबा घेऊन त्याला मुंबईत आणले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;