‘फोन पे, गुगल पे’ चा 24 तासांत खुलासा करा, आमदार संतोष बांगर यांना निवडणूक विभागाचे पत्र

‘फोन पे, गुगल पे’ चा 24 तासांत खुलासा करा, आमदार संतोष बांगर यांना निवडणूक विभागाचे पत्र

‘फोन पे करा, गुगल पे करा… काहीही करा, पण बाहेरगावी राहणार्‍या मतदारांना मतदानासाठी आणा!’ असे रोख आमिष दाखवणारे गद्दार आमदार संतोष बांगर यांना निवडणूक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. ‘फोन पे, गुगल पे’ चा 24 तासांत खुलासा करा, असे पत्रच निवडणूक विभागाने आमदार बांगर यांना दिले आहे.

कळमनुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमोर बोलताना आमदार संतोष बांगर यांनी बाहेरगावी राहणार्‍या मतदारांना ‘फोन पे करा, गुगल पे करा… काय लागते ते सांगा, गाड्या लावा, काहीही करा, पण मतदानासाठी आणा… असे रोख आमिष दाखवले. बाहेरगावी राहणार्‍या मतदारांच्या याद्या दोन दिवसांत देण्याचे फर्मानही त्यांनी कार्यकर्त्यांना सोडले होते. शिवसेनेचे विभागीय नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून निवडणूक आयोग या रोख आमिषावर कारवाई करणार का? असा सवाल केला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील आणि अजित मगर यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे रीतसर तक्रार करून आमदार बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शिवसेना पदाधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी तात्काळ दखल घेतली. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा भुते यांना आमदार बांगर यांच्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आमदार बांगर यांना ‘फोन पे, गुगल पे’ चा २४ तासांत खुलासा करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.

चोराच्या उलट्या बोंबा!
व्हिडीओतील आवाज माझा नाही, मला फोन पे, गुगल पे काय आहे हे माहिती नाही अशी उलटी बोंब गद्दार आमदार संतोष बांगर यांनी ठोकली आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी खुलासा करण्याचे पत्र दिल्यानंतर वृत्तवाहिनीशी बोलताना बांगर यांनी हा कांगावा केला. व्हिडीओ माझा असला तरी तो आवाज माझा नाही असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;