चंद्रपूर जिल्हातील 62 मतदान केंद्रावर हजारो बोगस मतदार; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर जिल्हातील 62 मतदान केंद्रावर हजारो बोगस मतदार; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

चंद्रपूर जिल्हात 62 मतदान केंद्रावर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ऑनलाईन नोंदणी झालेले हे सर्व मतदार परप्रांतीय आहे. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री 12 वाजेनंतर भरण्यात आल्याचे दिसून आले.

पैसे देऊन भरले अर्ज

गडचांदूर येथील एका कार्यालयात आजूबाजूच्या गावातील काही युवकांना पाचशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे मजुरी देऊन, मतदाराची बोगस नावे, त्यांचे आधार क्रमांक, चुकीचा मोबाईल क्रमांक व ओटीपी पुरवून अर्ज भरायला लावले असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याच्या ठिकाणी भिंतीचा फोटो व आधार अपलोड करण्याच्या ठिकाणी भिंतीचाच फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाइन उपलब्ध झालेल्या यादीमध्ये बोगस मतदाराचा फोटो उपलब्ध नाही. तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;