महागाईमुळे उत्सवाचा रंग फिका, इलेक्ट्रॉनिक आणि अन्य महागड्या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांची पाठ

महागाईमुळे उत्सवाचा रंग फिका, इलेक्ट्रॉनिक आणि अन्य महागड्या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांची पाठ

कांदे, टॉमेटो यांच्यासह खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने गृहिणींचे बजेट आधीच कोलमडले आहे. या महिन्याच्या अखेरीस दिवाळी सुरू होतेय. दिवाळी म्हटली की, नव्या वस्तूंची खरेदी आपसूकच येते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. मात्र यंदा चित्र वेगळे आहे. लोकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखी महागडी खरेदी कमी केली आहे किंवा पुढे ढकलली आहे. महागाईने उत्सवाची मजा फिकी केली आहे. ऑक्टोबर महिन्यातील नवरात्रोत्सवापासून फेस्टिव्हल सीझन सुरू झाला आहे. मात्र तरीही म्हणावी तशी शॉपिंगची चमक दिसून येत नाहीये. रॉयटर्सच्या अहवालानुसार, या वर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि होम अप्लायन्सच्या विक्रीचा वेग एकदम कमी आहे. येत्या दिवसांत विक्रीचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 महागाईने कंबरडे मोडले

रिझर्व्ह बँकेने वर्ष 2024-25 मध्ये आर्थिक विकास दर 7.2 टक्क्यांपेक्षा अधिक होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र ऑटो सेल्स, मॅन्युफॅक्चरिंग, पर्जेजिंग मॅनेजर इंडेक्ससारखे हाय इंडिकेटर्स आणि जीएसटी संकलनाचे आकडे अर्थव्यवस्थेत कमजोरीचे संकेत देत आहेत. त्यात महागाईची भर पडली आहे. खाद्यपदार्थ आणि भाज्यांच्या किमती वाढल्याने सप्टेंबर 2024 मध्ये महागाई दर 5.94 वर पोहोचला, तर खाद्य महागाई दर 9.24  टक्के आहे. भाजीपाल्याचा महागाई दर 36 टक्के राहिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;