विधानसभा निवडणूक तिकिटासाठी माजी मंत्री राज पुरोहित रस्त्यावर, महायुतीत बेबनाव
विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून महायुतीत बेबनाव सुरू असताना आता भाजपचे स्थानिक नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांनी आज भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राजस्थानी समाज बांधवांना घेऊन ठिय्या मारला होता. मुंबादेवी किंवा कुलाबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपवर मोर्चाच्या माध्यमातून दबाव टाकल्याची चर्चा होती.
विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाची महायुतीमधील चर्चा भाजपच्या दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींच्या दरबारात पोहोचलेली आहे, मात्र दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत.
राज पुरोहित यांच्यासाठी राजस्थानी समाजाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. राज पुरोहित आणि त्यांचे समाज बांधव हे निवेदन घेऊन नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालया बाहेर पोहोचले आणि ठिय्या दिला. या अनपेक्षित प्रकारामुळे भाजप प्रदेश कार्यालयात एकच धावपळ उडाली. भाजप प्रदेश कार्यालयातील काही पदाधिकाऱयांनी राज पुरोहित यांचे हे निवेदन स्वीकारले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List