कल्याण स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा डबा कोसळला, वाहतूक विस्कळीत
कल्याण स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 जवळ रात्री 8.55 सुमारास हा अपघात झाला आहे. कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाताना या लोकलचा शेवटचा डबा रुळावरून घसरला आहे. यात कुठलीही जीवितहानी झाली नसून कुठलाही प्रवासी जखमी झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List