धमकी मिळाल्यानंतर बिग बॉसच्या शुटींगसाठी सलमान सेटवर, 60 गार्ड हाय अलर्टवर

धमकी मिळाल्यानंतर बिग बॉसच्या शुटींगसाठी सलमान सेटवर, 60 गार्ड हाय अलर्टवर

सलमान खान याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा एकदा धमकी आहे. यावेळी सलमान खानकडून ५ कोटीची मागणी करण्यात आली आहे. सलमानला एकीकडे धमक्या मिळत असताना सलमान खान बिग बॉसच्या शुटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे. सलमान खानच्या जीवाला धोका आहे. त्यातच सलमान खानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी सलमानला पुन्हा एकदा धमकी आली असताना ही तो शुटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान शुटिंगला जाणार नसल्याचं आधी म्हटलं जात होतं. पण सलमान खानने बाहेर पडून शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शूटिंगसाठी तो फिल्मसिटीला पोहोचलाय. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुरुवारी देखील सलमान कडक सुरक्षेत बिग बॉस 18 च्या सेटवर पोहोचला होता.

ETimes च्या माहितीनुसार, सेटवर सलमानसाठी एक खास कंपाउंड बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये कोणालाही प्रवेश नाहीये. कंपाउंडच्या आत सलमानचा बंगला आहे, जेथे मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. येथे ओळखपत्र दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

‘बिग बॉस 18’ च्या टीमला शूट संपेपर्यंत सेटवरच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कुठेही बाहेर जाता येणार नाहीये. शूटिंग दुपारच्या जेवणानंतर सुरू झाली आहे. जी रात्रीपर्यंत चालणार आहे. सलमान खानने त्याच्या चित्रपटाचे शुटिंगही पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी केली आहे.

सलमान खान शुटिंग करत असलेल्या सेटवर 60 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. 18 ऑक्टोबरला सकाळी सलमानला धमकीचा मेसेज आला होता. लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवण्यासाठी सलमानकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 1998 पासून जेव्हा काळवीट शिकार प्रकरणात सलमानचे नाव समोर आले तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे लागला आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत तर वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला Y+ सुरक्षा दिली होती. यासोबतच शेराची खासगी सुरक्षाही आहे, जी सलमानची सुरक्षा करत आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपास 40 लोक आहेत.

सलमानच्या Y+ सुरक्षेत 2-4 कमांडोसह 11 पोलीस आहेत. मात्र आता या सुरक्षेत आणखी वाढ केली जाणार आहे. सलमान खान जिथे जाईल तेथील पोलीस स्टेशनला त्याआधी माहिती दिली जाईल. त्या जागेची स्थानिक पोलिसांकडून कसून चौकशी केली जाईल. तसेच सलमानसोबत एक पोलीस देखील आहे. जो सर्व प्रकारची शस्त्रे वापरण्यात माहीर आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;