दिल्लीत पाच नराधमांचा अल्पवयीनवर सामुहीक बलात्कार, तीन आरोपी महाराष्ट्रातले

दिल्लीत पाच नराधमांचा अल्पवयीनवर सामुहीक बलात्कार, तीन आरोपी महाराष्ट्रातले

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तराखंडच्या एका पंधरा वर्षीयमुलीवर पाच जणांनी सामुहीक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या पाचपैकी 3 मुलं ही रायगडमधील असून पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पिडीता दहावीला असून ती उत्तराखंड येथील हल्द्वानी येथील रहिवाली आहे, तिने उत्तराखंड येथून 4 ऑक्टोबर रोजी दिल्लीसाठी ट्रेन पकडली होती. तिच्यावर दिल्ली विमानतळ परिसरात 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी बलात्कार करण्यात आला. ही घटना तेव्हा समोर आली जेव्हा पिडीत मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार हल्द्वानी पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि मुलीचा फोन ट्रॅक केला. पोलिसांनी तिच्या फोनचे लोकेशन दिल्लीच्या हॉटेलमध्ये दिसले जिथे तिच्यावर बलात्कार झाला. याप्रकरणी पोलिसांनी पीडीतेचा जबाब नोंदवला असून तिला हल्द्वानी येथे आणण्यात आले आहे. पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून हे पाचही तरुण मित्र आहेत. ते दिल्ली आणि महाराष्ट्रातील आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हलद्वानी पोलिसांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय चाचणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निश्चित झाले. हे प्रकरण कलम 70 अंतर्गत नोंदवण्यात आले आहे आणि पोस्को कायद्यांतर्गत पाचही जणांवर गुन्हगा दाखल केला असून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. संदेश चिपळकर(25), रोशन पाटील (29), योगेश नाईक (34) हे रायगडमधील असून दिल्लीच्या आशिष आगरकर (30) आणि साहिल कुमार (24) अशी आरोपींची नावे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;